उस्मानाबाद -: जिल्ह्यातील माजी सैनिक तसेच माजी सैनिकांच्या कुटुंबियांच्या अडचणी सोडविण्यासाठी येथील जिल्हा सैनिक कार्यालयातील कल्याण संघटक 4 जानेवारी रोजी तुळजापूर , 10 रोजी कळंब, 17 रोजी वाशी, 18 रोजी उमरगा, 24 रोजी भूम आणि 28 जानेवारी  रोजी  लोहारा येथील तहसील कार्यालयात सकाळी 10 ते सायंकाळी 5-45 या वेळेत उपस्थित राहणार आहेत.
        तरी जास्तीत जास्त माजी सैनिक, विधवा, युध्द विधवा, अवलंबितांनी  व  संबंधितांनी याची नोंद घेवून उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे.
 
Top