उस्मानाबाद -: लोकांचे तंबाखु खाण्याच्या  विघातक सवयीकडे लक्ष वेधण्यासाठी आणि तरुण पिढीतील युवकांना तंबाखू सेवनापासून दुर ठेवण्यासाठी जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद येथे राष्ट्रीय  तंबाखू विरोधी दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. ए. आर. धाकतोडे यांच्या  मार्गदर्शनाखाली बाहय रुग्णविभागात तंबाखू पासून होणारे व्याधी व मुक्तता या विषयावर व्हिडीओ चित्रपट दाखविण्यात आला तसेच पोस्टर्स व रांगोळी प्रदर्शनाचे आयोजनही करण्यात आले होते.
         यावेळी  दंतशल्यचिकीत्सक डॉ. बी. ए. कठारे यांनी धुम्रपानामुळे / तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या  गंभीर आजारांची माहिती दिली. यावेळी प्रमुख उपस्थितांच्या हस्ते तंबाखू / सिगारेटची होळी करण्यात आली. यावेळी डॉ. एस. एस. देशमुख, डॉ. आर. पी. वाघमारे, डॉ. टी. एच. माने, डॉ. डी. के. पाटील. श्रीमती पानसे, श्रीमती कठारे आदि उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिध्दार्थ जानराव, दिपक गायकवाड, आर. के. शेख, श्री. मस्के, श्री. आकोसकर, श्री. बारकुल यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास रुग्ण व त्यांचे नातेवाईक बहुसंख्येने उपस्थित होते.
 
Top