उस्मानाबाद :- महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) या महाराष्ट्र शासन पुरस्कृत प्रशिक्षण संस्थेद्वरा ज्या सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना इंडस्ट्रीअल उद्योग सुरु करण्याची तीव्र इच्छा आहे. अशासाठी उस्मानाबाद येथे प्रथमच एक महिना कालावधीचा उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये भाग घेऊ इच्छिणा-यांनी अधिक माहितीसाठी व प्रवेश अर्जासाठी अर्चना माळी मो. 9822671421 कार्यक्रम समन्वयक, एमसीईडी द्वारे जिल्हा उद्योग केंद्र, उस्मानाबाद यांच्याशी दि. 5 जानेवारी 2013 पर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन  राजशेखर शिंदे, क.प्रकल्प अधिकारी, एमसीईडी, उस्मानाबाद यांनी केले आहे.
       या प्रशिक्षणामध्ये उद्योगाची निवड कशी करावी, उद्योगासाठी आवश्यक असणा-या सर्व कायदेशीर बाबी, कच्चा माल व योग्य मशिनरीची निवड, उद्योगाच्या विविध संधीची माहिती व सिध्दी प्रेरणा प्रशिक्षण कार्यक्रम, प्रकल्प अहवाल, केंद्र व राज्य सरकारच्या कर्ज विषयक विविध योजनांची माहिती, विविध उद्योगाची माहिती उदा:-मिनरल वॉटर, कुल स्टोरेज, वेअर हाउस, लघु उद्योग, शेती व दुग्ध व्यवसायावर आधारीत उद्योग, स्टोन क्रेशर इ. इंडस्ट्रीयल प्रकल्पाची माहिती काही निवड उद्योगांना भेट तसेच बाजारपेठ इ. उद्योगासंबंधी लागणारी सर्व माहिती या एक महिन्यांच्या कालावधीमध्ये विविध तज्ञ मार्गदर्शकांद्वारे माहिती दिली जाणार आहे.
     हा प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केल्यानंतर एमसीईडी द्वारे उद्योग सुरु होईपर्यंत सतत पाठपुरावा केला जाणार आहे. याचा उपयोग उद्योग सुरु होण्यासाठी प्रशिक्षणार्थींना होणार आहे. तसेच या प्रशिक्षणामध्ये विविघ विषयांवरील साहित्य उपलब्ध करुन दिले जाणार आहे.
 
Top