उस्मानाबाद -: ध्वजदिन 2012 निधी संकलन शुभारंभ कार्यक्रम 5 जानेवारी 2013 रोजी सकाळी 11 वाजता महसूल कर्मचारी भवन जिल्हाधिकारी कार्यालय आवार, उस्मानाबाद येथे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, उस्मानाबाद यांनी कळविले आहे.
या कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी, एस. एल. हरिदास यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमात ध्वजदिन 2012 निधी संकलन शुभारंभ, ध्वजदिन निधी संकलन 2011 मध्ये उत्कृष्ट संकलन केलेल्या कार्यालय, यंत्रणेस बक्षिस, प्रशस्तीपत्राचे वाटप, युध्द विधवा, वीर माता, पिता, विशेष गौरव पुरस्कार तसेच निवडक माजी सैनिकांच्या पाल्यांचा सत्कार व माजी सैनिकांच्या पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार, शैक्षणिक शिष्यवृत्ती व इतर कल्याणकारी योजनेचे आर्थिक मदतीचे धनादेश प्रमुख पाहूण्यांचे हस्ते वितरीत करण्यात येणार आहेत.
जिल्हयातील सर्व माजी सैनिक, युध्द विधवा, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.