सोलापूर -: सर्व केरोसिन कार्ड लाभार्थ्यांनी केरोसीन सबसिडीसाठी राष्ट्रीयकृत बँकांमध्ये आपले खाते २८ फेब्रुवारी 2013 पर्यंत उघडावे अन्यथा त्यांना बाजारभावाप्रमाणे रॉकेल खरेदी करावे लागेल असे अन्नधान्य वितरण अधिकारी संतोष भोर यांनी सुचित केले आहे.
   या संदर्भात अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीतील सर्व झोनल अधिकारी भोर यांनी सुचना दिल्या. यावेळी लीड बँकेचे महाव्यवस्थापक माधव कोरवार उपस्थित होते.
     भोर बैठकीत सुचना देताना म्हणाले की, सर्व झोनल अधिका-यांनी पात्र केरोसीन कार्ड धरकाकडुन विहित नमुन्यातील अर्ज भरुन घ्यावेत. तसेच सर्व कार्ड धारकांनी राष्ट्रीयकृत बँकेत स्वत:चे खते शुन्य अकाऊण्ट बॅलन्सवर २८ फेब्रुवारी २०१३ पर्यंत खाते उघडुन घ्यावे. अन्यथा त्यांना अनुदानीत केरोसीन मिळणार नसुन बाराजपभावाप्रमाणे केरोसिन खरेदी करावे लागेल. यासाठी स्वत: लाभधारकांनाच जबाबदार धरण्यात येईल असेही श्री. भोर बैठकीत म्हणाले.
    श्री. कोरवार बैठकीत म्हणाले की, बँकांनी अशी खाती उघडण्यास अडचण निर्माण केल्यास संबंधित बँकेचा तसा अहवाल राज्यस्तरीय बँकर्स कमिटीकडे पाठविण्यात येईल. बैठकीस सर्व झोनल अधिकारी उपस्थित होते.
 
Top