
जिल्हा निहाय भर्ती कार्यक्रम पुढीलप्रमाणे सिंधुदुर्ग व रत्नागिरी दि. १ फेब्रुवारी कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी दि. २ फेब्रुवारी (सोल्जर ट्रेडमन), कोल्हापूर दि. ३ फेब्रुवारी, सातारा ४ फेब्रुवारी, सांगली ५ फेब्रुवारी, सोलापूर ६ फेब्रुवारी, वरील सर्व जिल्हे ७ फेब्रुवारीरोजी भरती कार्यक्रम राहील.
भरती कार्यक्रम जिल्हा निहाय असून फक्त संबंधित जिल्ह्यातील उमेदवारांना भरतीच्या ठिकाणी सकाळी ४ ते ८ वा. दरम्यान प्रवेश दिला जाईल. सेवारत सैनिकांची मुले, माजी सैनिकांची मुले, वीरपत्नी, दिवंगत सैनिकांची मुले, एनसीसी प्रमाणपत्रधारक उमेदवार तसेच खोळाडू हे दि. ७ फेब्रुवारी या नियोजित तारखे व्यतिरिक्त भरतीस हजर राहू शकतील परंतु त्यांना देय होत असणारी सवलत/अतिरिक्त गुण (बोनस) दिले जाणार नाहीत. भरतीसाठी येतेवेळी उमेदवारांनी मूळ कागदपत्रे व त्यांच्या दोन झेरॉक्स प्रती राजपत्रित अधिका-याद्वारे साक्षांकित केलेल्या सोबत आणणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर दुरध्वनी क्र. ०२१७-२७३१०३५ येथे संपर्क साधावा.