भूम -:  सन १९९४ मध्ये भुम पोलीसांच्‍या हद्दीत घरफोडीचा गुन्हा घडल्याने गुरनं ७६/१९९४ कलम ४६१,३८० भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदर गुन्हयातील निष्‍पन्‍न आरोपी भागवत शिवराम काळे हा सदरचा गुन्हा केल्‍यापासुन फरार होता. पोलीस त्याचा शोध घेत होते परंतु तो मिळुन येत नव्हता. सदर आरोपीविरूध्द न्यायालयाने वारंवार समंन्स व वारंन्ट काढुनही तो मिळुन येत नसल्याने जाहिरनामा काढुन त्याला फरार घोषीत केले होते.
        सदरचा आरोपी वाशी येथे त्याचे नातेवाईकांकडे देवकार्यासाठी येणार असल्याची माहिती दरोडा प्रतिबंधक पथकास मिळाल्याने दरोडा प्रतिबंधक पथकाने सापळा रचुन दि. २८ जानेवारी रोजी एका शेतामध्ये यातील फरारी आरोपी नामे भगवान षिवराम काळे रा.जोगेश्‍वरी पीडी, पारा ता. वाशी यास ताब्यात घेवुन त्याचेकडे सखोल चौकशी करून त्याला पुढील कार्यवाहीसाठी भुम पोलीसात हजर केले आहे. सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक सचिन पाटील, अपर पोलीस अधिक्षक, बाळकृष्‍ण भांगे व गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक एम.डी. गुंडीले यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा प्रतिबंधक पथकाचे पोउपनि गोमारे व त्यांचे सहकारी मधुकर घायाळ, संजय पानसे, तानाजी माळी, मोईज काझी, वाहेद मुल्ला, नाना भोसले, सुनिल कोळेकर, प्रफुल ढगे, सचिन कळसाईन यांनी केली आहे.

 
Top