उस्मानाबाद -: औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उस्मानाबादच्या वतीने जिल्हयातील विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या १७ उमेदवारांना मागेल त्या व्यवसाय प्रशिक्षण योजनेअंतर्गत अल्पमुदतीच्या एम.ई.एस. या योजनेतील तीन महिन्याच्या कालावधीचे संगणक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण १ फेब्रुवारीपासून सुरु होणार असून इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज कार्यालयीन वेळेत ३१ जानेवारीपर्यंत प्रत्यक्ष सादर करावेत, अर्जासोबत स्वत:चा फोटो, शैक्षणिक अर्हतेच्या छायांकित प्रतीसह जातीचे प्रमाणपत्र जोडावेत, असे प्राचार्य  बी.एस.गायकवाड यांनी कळविले आहे.   
        प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना नियमाप्रमाणे विद्यावेतन व अनुज्ञेय असलेल्या व्यवसायासाठी टूलकिट देण्यात येणार आहे.
 
Top