सांगोला (राजेंद्र यादव) : सांगोला शहरातील कडलास नाका भागातील ५ दुकानांना रविवार दि. १० फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. नगरपालिकेची अग्निशमन दलाची गाडी वेळेवर पोहोचू शकली नाही. नवी गाडी आल्यानंतर पहिल्यांदाच आग विझवण्याचे काम या गाडीला लागले परंतु पहिल्याच प्रसंगाला अग्निशमन दल नापास झाल्याची चर्चा उपस्थितांतून केली जात होती.
सांगोला-मिरज रस्त्यावर कडलास नाका भागात अनेकांची दुकाने आहेत. रविवार रोजी अमावस्या असल्याने दुकानात पूजा करुन दुकाने बंद करुन दुकानदार घरी पोहोचले नाहीत तोपर्यत आग लागली. ही आग शॉर्टसर्कीटमुळे लागली की दुकानात लावलेल्या अगरबत्तीमुळे लागली हे नक्की समजलेले नाही. मात्र एका दुकानाला लागलेल्या आगीनंतर ही आग क्षणार्धात पसरत जावून पाच दुकाने भस्मसात झाली. नगरपालिकेची अग्निशमन दलाची गाडी गेल्या तीन महिन्यांपूर्वी आली आहे. ती आल्यानंतर आज लागलेली ही आग विझवण्यासाठी दल वेळेत पोहोचू शकले नाही. त्यामुळे नागरिकांनी नगरपालिकेच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली. आगीत नेमके किती नुकसान झाले ते मात्र नंतरच समजणार आहे.