उस्मानाबाद -: शेतक-यांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी कृषी विभागाने कामाची उपलब्धता लक्षात घेऊन अन्य विभागाच्या तुलनेत शेततळे व जलसंधारणाची जास्तीत जास्त कामे सुरु करावीत, असे निर्देश राज्याचे कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
शासकीय विश्रामगृह, भूम येथे आयोजित जिल्हास्तरीय अधिका-यांच्या बैठकीत त्यांनी वरील निर्देश दिले. यावेळी गोदावरी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार राहूल मोटे, आप्पासाहेब पाटील, कृषी आयुक्त उमाकांत दागंट उपस्थित होते.
कृषीमंत्री विखे पाटील म्हणाले की, दुष्काळी परिस्थितीत चा-याचा प्रश्न उपस्थित होत आहे. जनावरे पशुधन जगण्यासाठी व भविष्यात जनावरांसाठी चारा कमी पडणार नाही यासाठी जुनपर्यंत चारा पुरेल यासाठी गाव व तालुकानिहाय तपशीलवार नियोजन करावे. चा-याची कमतरता पडणार नाही, यासाठी विशेष मोहिम हाती घ्यावी, अशी सूचना दिल्या.
शेततळे, विहिरी व फळबाग लागवडीसाठी मागणीप्रमाणे प्रस्ताव आल्यास तात्काळ मंजूर करुन जलसंधारणाच्या कामांना तातडीने प्राधान्य द्यावे,अशीही सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी संचालक कृषी आनंदराव जावळे, विभागीय कृषी संचालक कृष्णा देशमुख, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.भोसले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.चंदेल, तालुका कृषी अधिकारी नाईकवाडी तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.