बार्शी -: बार्शी नगरपरिषदेचे स्‍वीकृत नगरसेवक नागेश अक्‍कलकोटे यांची राष्‍ट्रवादी युवक कॉंग्रेसच्‍या प्रदेश सेक्रेटरीपदी निवड करण्‍यात आली.
    मुंबई येथील राष्‍ट्रवादी भवनातून यांची घोषणा करण्‍यात आली. यावेळी प्रदेशाध्‍यक्ष उमेश पाटील यांनी नियुक्‍ती पत्र दिले. आमदार दिलीप सोपल यांच्‍या शिफारशीने व उपमुख्‍यमंत्री अजितदादा पवार यांच्‍या आदेशान्‍वये सदरच्‍या नियुक्‍ती करण्‍यात आली. यावेळी आ. मधुकर पिचड, खजिनदार हेमंत टकले, विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे अध्‍यक्ष अण्‍णा डांगे, बार्शीतील सुधीर काळे, बाळासाहेब पिसाळ, अतुल चालखोर, नारायण लोखंडे, मेजर आवारे आदी उपस्थित होते.
    औद्योगिक वसाहतीचे चेअरमन सुधीर सोपल, आर्यन शुगर्सचे चेअरमन योगेश सोपल, नगराध्‍यक्ष कादर तांबोळी, उपनगराध्‍यक्ष राहुल कोंढारे, राष्‍ट्रवादी युवकचे अमोल गुडे, संताजी सावंत, विजय ठोंगे, मनिष चौहान यांनी अभिनंदन केले. यावेळी अक्‍कलकोटे यांनी मिळालेल्‍या संधीचे सोनं करुन दाखविण्‍याचा आत्‍मविश्‍वास व्‍यक्‍त केला.
 
Top