उस्मानाबाद -: नेहरु युवा केंद्र चित्तोड, आंध्रप्रदेश यांनी तिरुपती येथे दि. २० ते २६ फेब्रुवारी या कालावधीत राष्ट्रीय एकता शिबीर आयोजित केले आहे. या शिबीरासाठी संलग्न नेहरु युवा मंडळातील १३ ते ३५ वयोगटातील १० युवक व १० युवतीची निवड करण्यात येणार आहे. विविध कला क्षेत्रातील गुणवंत, कार्यशील व शारिरीक सुदृढ युवक-युवतींनी १५ फेब्रुवारीपर्यत केंद्राच्या कार्यालयात अर्ज करावेत, असे आवाहन नेहरु युवा केंद्र, उस्मानाबादचे जिल्हा युवा समन्वयक मोहन गोस्वामी यांनी केले आहे.