बार्शी : येथील प्रसिध्द व्यापारी सिकंदर वजीर शेख यांचे सुपुत्र मोहसीन शेख हे पुणे विद्यापीठातून सी.ए. पदवी परीक्षेत उत्तीर्ण झाले. तसेच बार्शी पोलिसांतून पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झालेल्या अन्वर मुजावर यांना मिळालेल्या यशानंतर एम.हनीम बागवान यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
     हा कार्यक्रम मुस्लिम समाजाचे रमजानभाई तांबोळी समाज मंदिरात पार पडला. यावेळी  अध्यक्षस्थानी अँड.हाजी अब्दुल गन्नी बाबुलालभाई तांबोळी, नगराध्यक्ष कादरभाई तांबोळी, डॉ. मौलाना शेख, शकीलभाई शेख (इंजि.), मुनीर शेख, रत्नाकर मांधळे, बिपीनचंद्र नाईकावाडी, रफीकभाई तांबोळी, मुर्तूज शेख, इकबालभाई बाटलीवाला, हाजी लतीफभाई चौधरी, बिलाल तांबोळी, महदिमियॉ लांडगे, , नंदकुमार होनराव, बापूसाहेब शितोळे,  शौकत तांबोळी आदि मान्यवरांसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
     यावेळी बोलतांना तांबोळी यांनी म्हटले, सी.ए.सारख्या कठीण परीक्षेत सुयश संपादन करुन मोहसीन शेख यांनी  समाजाचे नांव केले आहे. याचप्रमाणे पोलिस निरीक्षकपदी निनवड झालेले अन्वर मुजावर यांनीही आजपर्यंत अत्यंत चांगल्या पद्धतीने आपली नोकरी बजावली आहे. यांचा सत्कार हा पुढील पिढीला आदर्श व त्यांनी त्यातून प्रेरणा घेण्यासाठी करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले. अँड. असिफभाई तांबोळी यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

 
Top