बार्शी : मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी राज्यभर सुरु असलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून बार्शीतील लहूजी शक्ती सेनेच्या कार्यकर्त्यांनी रॅली काढून बार्शी तहसिलसमोर लाक्षणीक उपोषण केले.
याबाबत तहिसलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अनुसूचित जातीमध्ये अ,ब,क,ड, नुसार वर्गवारी करावी व समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे, समाजाच्या विकास व प्रगतीसाठी समाजकल्याण, कृषी, पशू, संवर्धन, दुग्ध मत्स्य, फलोत्पादन इ. खात्यामार्फत बिहार राज्यासारखे अ,ब,क,ड, वर्गवारीनुसार उपेक्षित समाजाला न्याय मिळावा, विधानभवनासमोर लहुजी वस्ताद यांचा पुतळा, संगमवाडी येथे राष्ट्रीय स्मारकासाठी १०० कोटीची तरतुद करावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
सदरच्या उपोषणात शहराध्यक्ष प्रशांत काळे, सचीव भारत डोंगरे, आनंद चांदणे, अविनाश ढाळे, कृष्णा चव्हाण, नितीन पेटाडे यांनी उपोषण केले.