बार्शी : गौडगाव (ता.बार्शी) येथे महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्याचे पद रिक्त असून दोन वायरमनच्या जागा असून मागील सहा महिन्यापासून यासाठी एकही कर्मचारी उपलब्ध नसल्याने याबाबत सामाजिक कार्यकर्ते राहुल भड यांनी जिल्हाधिका-यांकडे निवेदन सादर केले आहे.
विद्युत विभागाच्या गौडगाव सर्कलमध्ये गौडगाव, रऊळगाव, संगमनेर, भालगाव, मिर्झनपूर, आळजापूर, आंबेगाव, जोतीबाची वाडी, अंबाबाईची वाडी, चिंचखोपण, सारोळा-भांडेगांव, कासारी, मालेगाव-मुंगशी, निंबळक, रुई ही १८ गावे येत असून येथे असलेले गौडगाव सर्कल हे केवळ नावालाच कार्यालय आहे. आपल्या तक्रारी तसेच वीज बिलासाठी या ठिकाणच्या वीज ग्राहकांना वैराग येथे जावे लागत असून सर्वसामान्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.