नळदुर्ग -: प्रज्ञावंत बहुउद्देशीय सेवाभावी सामाजिक संस्‍था नळदुर्ग द्वारा दिला जाणारा बोधिसत्‍व डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्‍यस्‍तरीय समता पुरस्‍कार या पुरस्‍कारासाठी राज्‍यभरातून प्रस्‍ताव मा‍गविण्‍यात येत आहेत. महाराष्‍ट्र राज्‍यात विविध क्षेत्रात उल्‍लेखनीय काम करणा-या व्‍यक्‍तीना समता पुरस्‍कार देऊन त्‍याचा मान्‍यवरांच्‍या हस्‍ते गौरव करण्‍यात येणार असून सदरील प्रस्‍ताव दि. 15 मार्च 2013 पर्यंत नळदुर्ग (ता. तुळजापूर, जि. उस्‍मानाबाद) येथे पाठविण्‍याचे आवाहन सचिव दादासाहेब बनसोडे यांनी केले आहे.
 
Top