नळदुर्ग -: साखरपुड्याच्या कार्यक्रमामध्ये प्रीती भोजनातून विषबाधा झाल्याने जवळपास चाळीस नागरिकांना उलट्या व जुलाबाचा त्रास होत असल्याने त्यांना तात्काळ सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना निलेगांव (ता. तुळजापूर) येथे सोमवार रोजी सायंकाळी सात वाजता घडली. दरम्यान या घटनेत नवनाथ खोत यांच्या कुटुंबियातील सदस्यानाही मोठ्या प्रमाणावर विषबाधा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
तुळजापूर तालुक्यातील निलेगाव येथील नवनाथ खोत यांच्या घरी टिळा लावण्याचा (साखरपुडा) कार्यक्रम सोमवार रोजी होता. कुंभारी येथील पाहुणे मंडळीचा निलेगाव येथे आगमन झाल्यानंतर टिळा लावण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर भोजनाचा कार्यक्रम होऊन पाहुणे मंडळी आपल्या गावी निघून गेले. पाहुण्यापैकी एकास उलट्याचा त्रास झाल्याचे समजते. त्यानंतर सायंकाळी सहा ते सात वाजण्याच्या दरम्यान गावातील प्रतिष्ठित नागरिक, नातेवाईक यांनी साखरपुड्याच्या जेवणाचा आस्वाद घेतला. त्यानंतर काहींना उलट्या, जुलाबचा त्रास होऊ लागला. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून सात ते आठ जणांना रूग्णालयास उपचारासाठी हलविले. ही घटना घडल्यानंतर आणखी काही जणांना उलट्या, मळमळणे, डोके गरगरणे असा त्रास होत असल्याने अनेकांना टेम्पो, जीप व मिळेल त्या वाहनाने तात्काळ सोलापूर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे श्रीनिवास खोत यांनी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले की, पिण्याचे पाणी विहिरीतील होते. हा प्रकार नेमका कशामुळे झालया याची माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेत अंदाजे ३० ते ४० जणाना विषबाधा झाल्याची प्राथमिक चर्चा आहे.
दरम्यान या घटनेनंतर नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांनी निलेगाव व सोलापूर येथील शासकीय रूग्णालयात जाऊन रूग्णांची भेट घेऊन विचारपूस केली. परिस्थिती नियंत्रणात असून या प्रकरणाची चौकशी करण्याकरीता अन्न भेसळ अधिकारी यांना पाचारण करण्यात आल्याचे पुढारीशी बोलताना प्रकाश गायकवाड यांनी सांगितले.