अरुण बोत्रे
सांगोला (राजेंद्र यादव) : सांगोला नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी पत्रकार अरुण बाबुराव बोत्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
     पिठासन अधिकारी तहसीलदार नागेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सांगोला नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदाच्या एका जागेसाठी अरुण बोत्रे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड झाल्याचे पाटील यांनी जाहीर केले. मंगळवारी सकाळी झालेल्या या बैठकीला नगराध्यक्ष मारूतीआबा बनकर, उपाध्यक्ष अरुण बिले, नगरसेवक प्रा. प्रबुध्दचंद्र झपके, नवनाथ पवार, शिवाजी बनकर, इमाम मणेरी, अनिल खडतरे, मधुकर कांबळे, दामोदर नरुटे, नगरसेविका संजीवनी संजय शिंगाडे, ज्योती आनंद घोंगडे, कु. तस्कीन तांबोळी, वैशाली बाळासाहेब झपके, अरुणा रावसाहेब इंगोले, रेश्मा दिपक बनसोडे, शोभा निवृत्ती फुले, विठ्ठलराव शिंदे, बशीरभाई तांबोळी, तानाजीकाका पाटील, मनोज सपाटे, आनंद घोंगडे, बाळासाहेब झपके, अॅड. संजीव शिंदे, निवृत्ती फुले,अवधूत कुमठेकर, चंद्रकांत दिवटे, दिपक चोथे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
     अरुण बोत्रे यांची निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून व गुलालाची मुक्त उधळण करीत आनंद साजरा केला. निवडीनंतर सभागृहात तहसीलदार नागेश पाटील, नगराध्यक्ष बनकर, उपाध्यक्ष बिले, पत्रकार राजेंद्र यादव, निसार तांबोळी, विनायक मस्के, मोहन शिंदे यांनी बोत्रे यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या. तर नगरपालिका प्रांगणात श्री चौंडेश्‍वरी युवक संघटना व देवांग कोष्टी समाजाच्यावतीने बोत्रे यांचा सत्कार करण्यात आला. बोत्रे यांनी आपल्या निवडीनंतर आपणास मिळणार्‍या एक वर्षाच्या कालावधीत आमदार गणपतराव देशमुख, आमदार दिपकाआबा साळुंखे-पाटील, माजी आमदार शहाजीबापू पाटील व इतर ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली योग्य पध्दतीने  चांगले काम करु असे सांगितले.
    अरुण बोत्रे यांचे वडील कै. बाबुराव रामचंद्र बोत्रे हे १९७४ ते १९७९ या कालावधीत स्वीकृत नगरसेवक होते. जवळपास ३९ वर्षांनतर बोत्रे कुटुंबातील अरुण बोत्रे यांना स्वीकृत नगरसेवकपदाची संधी मिळाली आहे. त्यांनी वृत्तपत्र विक्रेता, पत्रकार व आता नगरसेवक असा प्रवास साधला आहे.
 
Top