उस्मानाबाद :- माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी/ मार्च २०१३ मध्ये जुन्या अभ्यासक्रमाच्या विज्ञान शाखेच्या पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी स्वतंत्र केंद्रावर बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे. जुन्या अभ्यासक्रमाच्या पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्याचे प्रवेशपत्र अद्याप घेतले नसतील अशा शाळेच्या प्राचार्यांनी मंडळ कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधून सुधारित बैठक क्रमांकाचे प्रवेशपत्र विनाविलंब घेवून जावे आणि सदर विद्यार्थ्याचे प्रवेशपत्र त्यांना वाटप करावे. यामुळे विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही याची दक्षता संबधित प्राचार्यानी घ्यावी तसेच यासाठी विज्ञान शाखेच्या पुनर्पक्षार्थी ( रिपीटर ) जुन्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यानी स्वत: होवून आपल्या प्राचार्य, मुख्याध्यापक यांचेशी संपर्क साधावा व तालुका स्तरावरील परिक्षा केंद्राची माहिती करुन घ्यावी असे आवाहन मंडळाचे सचिव घोनमोडे यांनी सर्व प्राचार्य व संबधित विद्यार्थ्यांना केले आहे.