उस्मानाबाद :- येथील जिल्हा सामान्य रुग्णालच्या बाह्य रुग्ण विभागात मौखिक आरोग्य दिन जिल्हा शल्य चिकत्सक डॉ. अशोक धाकतोडे यांचे मार्गदर्शनाखाली नुकताच साजरा झाला.
यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशिल सरडे यांनी बाहय रुग्ण विभागात मौखिक आरोग्य व तंबाखू दुरुपयोगाबाबतचे पोस्टर प्रदर्शन तसेच मौखिक आरोग्य माहिती चलचित्रपटाचे उदघाटन केले. यानंतर जिल्हा रुग्णालयातील दंत शल्यचिकत्सक डॉ. बी. ए. कठारे यांनी मौखीक आरोग्याबदल तसेच तंबाखू दुष्परिणामाबाबत उपस्थितांना माहिती दिली. या निमित्ताने रुग्णालयातील दंत विभागात मौखिक आरोग्य तसेच तंबाखु, गुटखा, सिगारेटपासून होणा-या कॅन्सरबाबत माहिती देणारे प्रदर्शन मांडण्यात आले होते. याचा लाभ रुग्णालयातील उपस्थित रुग्णांनी व नातेवाईकांनी घेतला. या प्रसंगी डॉ. सचिन देशमुख, डॉ. डी. के. पाटील, डॉ. महेश कानडे, डॉ. रामढवे, डॉ. आळंगेकर, डॉ. आदटराव आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कोरे, जानराव, शेळके, कांबळे आदी सामाजिक कार्यकर्ते तसेच औषधनिर्माण अधिकारी दिपक गायकवाड व आर. के शेख यांनी परिश्रम घेतले.