बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : संबंधित शाळेच्या परिसरात बालिकेवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर पोलसांनी पालक, संबंधित संस्थेचे पदाधिकारी, पोलिस, पत्रकार यांच्या संयुक्त बैठकीचे सोमवारी आयोजन केले होते. परंतु अध्यक्षांसह स्थानिक संचालकांनी विविध खाजगी कारणे सांगत बैठकीस अनुपस्थिती दर्शविली. त्यामुळे पालकांतून संताप व्यक्त केला जात आहे.
बार्शी येथील त्या शाळेत शिकणार्या मुलीस एका नराधमाने दमदाटी करुन विनयभंग केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर आरोपीस रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यातही देण्यात आले. आरोपीला पोलिस कोठडीही देण्यात आली. परंतु संबंधित शाळेच्या बेजबाबदार वर्तणुकीवर कायमस्वरुपी तोडगा निघावा, संस्थेतील महत्वाचे अत्यावश्यक बदल करण्यात यावेत तसेच अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये याकरिता पालकांनी एकत्रित्रतपणे लढण्याचा निर्णय घेतला. संस्थेतील पदाधिकार्यांना जाब विचारण्याचे ठरविले. पोलिस निरीक्षकांनी पालकांच्या तीव्र भावना लक्षात घेत त्यांना बैठकीत चर्चा करण्याची विनंती केली, त्यानुसार सोमवारीसकाळी ११ वाजता बैठक बोलावण्यात आली होती. शाळेचे पदाधिकारी गैरहजर राहिले. त्यानुसार बैठकीस उपस्थित राहिलेल्या पालकांना सांगण्यात आले. यावर पालकांनी मोठ्या प्रमाणात निषेध करत अशा प्रकारच्या संचालकांनी राजीनामे द्यावेत आणि संस्थेवर प्रशासकाची नेमणूक करण्याची मागणी केली.
यावेळी पालकांपैकी एकाने बोलतांना शाळेला संरक्षण कुंपण नसल्याने कोणीही आत प्रवेश करतो, मुलींच्या स्वच्छता गृहाला दरवाजे नाहीत, शालेय पोषण आहाराचे अन्न उघड्यावर शिजविले जाते याकरिता संस्थेकडे निधी उपलब्ध नसल्यास पालक गावातून झोळी घेऊन भिक मागून निधी उपलब्ध करतील व या संस्थेच्या विविध सुविधा पूर्ण करतील.
नगरपालिकेच्या शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी चिलवंत यांनी पालकांना आमच्या कडून वेळोवेळी शाळांची तपासणी केली जात असल्याचे सांगताच एका महिला पालकांने प्रशासन अधिकार्यांना तुमचे डोळे त्यावेळी कुठे गेले होते या गोष्टी दिसून आल्या नव्हत्या का अथवा यापुढे तुम्ही कोणती ठोस पावले उचलणार असे म्हटले यावेळी प्रशासनाधिकारी यांनी खाली मान घातली.
एका महिला पालकांनी सुरु असलेल्या गोंधळाची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांना भ्रमणध्वनीद्वारे कळविली व सदरच्या संस्थेतील गैरप्रकार थांबिवण्याची विनंती केली. यावेळी डॉ. गेडाम यांनी शिक्षण विभागाकडून संपूर्ण चौकशी करण्यात येईल असे आश्वासन दिले.
संबंधित संस्थेच्या अध्यक्षांनी संचालक यांच्यासमोर पालक सभा झाल्याशिवाय शाळा चालू दिली जाणार नाही अशी भूमिका पालकांनी घेतल्याने दि. १६ रोजी बैठक घेण्यात येईल असे लेखी पत्र संस्थेच्यावतीने पालकांना देण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष अमित रसाळ, शिवसेनेचे शहराध्यक्ष दिपक आंधळकर, मानवाधिकार संघटनेचे जिल्हा सचिव सोमनाथ पेठकर तसेच जिल्हाध्यक्ष शकील मुलाणी, शिवराज्य सेना बार्शीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, विजय राऊत, कुलकर्णी, देशमुख, पोलिस निरीक्षक गजेंद्र मनसावाले, महिला पोलीस उपनिरीक्षक पडवळ, महिला पोलीस उपनिरीक्षक जाधव, नगरपालिकेच्या शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी चिलवंत यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.