उस्मानाबाद -: राज्याचे पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा.वडगाव लाख.खंडाळा या दुष्काळी भागाची पाहणी करुन नागरीकांच्या अडी अडचणी समाजवून घेतल्या. यावेळी नागरीकांना पिण्याचे पाणी तसेच रोजगारासाठी कामाची हमी देण्याबाबत त्यांनी आश्वस्त केले.
या दौ-याप्रसंगी त्यांच्यासमवेत जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आप्पासाहेब पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन पाटील, जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन सभापती पंडित जोकार, पंचायत समिती तुळजापूरचे उपसभापती प्रकाश चव्हाण, तहसिलदार व्ही.एल. कोळी, गटविकास अधिकारी तृप्ती ढेरे, तालुका कृषी अधिकारी जाधव यांच्यासह सबंधित अधिकारी उपस्थित होते.
गावातील विहिरी तसेच तलावातील गाळ काढण्याच्या कामांना प्राधान्य दया, ज्याठिकाणी विंधन विहिरींना पाणी आहे, त्याठिकाणी तात्काळ विद्यूतपंप बसवूननागरीकांच्या पिण्याच्या पाण्याची तात्काळ व्यवस्था करा,अस निर्देश त्यांनी संबधितांना दिले. तालुक्यात रोजगार हमीअंतर्गत कामांचे नियोजन करण्यात आले आहे. ज्याठिकाणी मजूर उपलब्ध आहेत त्याठिकाणची कामे तात्काळ सुरु करा,असे आदेश त्यांनी दिले. या वेळी सरपंच, उपसरपंच, ग्रमसेवक, तलाठी, यांच्या सह संबधीत गावातील नागरिक मोठया संखेने उपस्थित होते.