सोलापूर : गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी दहावी व बारावी परीक्षेच्या अनुषंगाने जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी एका बैठकीत शिक्षण विभागाला केले.
सोलापूर, पंढरपूर आणि सांगोला येथील विविध उच्च शिक्षणाच्या महाविद्यालयांमुळे सोलापूर जिल्हा शैक्षणिक हब म्हणून उदयास येत आहे. हुषार विद्यार्थ्यांना विदेशात शिक्षणाच्या उच्च संधी प्राप्त होण्यासाठी प्रशासनाने पायाभूत सुविधा विद्यार्थ्यांना दिल्या पहिजेत. तसेच दहावी व बारावी वर्गासह इतर होणा-या परीक्षांमध्ये सामुदायीक कॉपी प्रकाराला आळा बसला पाहिजे. यासाठी शिक्षण विभागाने संपूर्ण जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान राबवून जिल्हा कॉपीमुक्त करण्यावर भर दिला पाहीजे अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी केल्या.
यासाठी पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधिक्षक आणि जिल्हा प्रशासनाने सहकार्य करण्याची अपेक्षा त्यांनी बैठकीत व्यक्त केली. बैठकीस शिक्षण विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.