सोलापूर -: राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत सोलापूर विद्यापीठात करण्यात आलेल्या जलसंधारण कामाची व वृक्ष लागवडीची पाहणी जिल्ह्याचे पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी केली.
    यावेळी त्यांच्यासमवेत कुलगुरु डॉ. एन. एन. मालदार, कुलसचिव कॅ. नितीन सोनजे, बी.सी.यु.डी. संचालक डॉ. भांजे, विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. कांबळे उपस्थित होते.
    सोलापूर विद्यापीठ परिसरातील जागेमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत साग, आंबा, बाभुळ यासह इतर अनेक झाडांची लागवड करण्यात आली आहे. दुष्काळी परिस्थितीतही विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी केलेल्या जलसंधारणाच्या कामामुळे ही झाडे चांगल्या स्थितीत आहेत. याबद्दल पालकमंत्र्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
    विद्यापीठ परिसरातील इतर रिक्त जागेतही असा नाविण्यपूर्ण प्रयोग केल्यास निश्चितच याचा चांगला परिणाम होईल असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला. झाडाचे खड्डे खणण्यासाठी जेसीबी मशीनला लागणा-या इंधनाची व्यवस्था प्रस्ताव दिल्यास जिल्हा नियोजन विकास समितीकडुन दुष्काळी कामाअंतर्गत केल्या जाईल असे आश्वासनही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
 
Top