बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: बार्शी कासारवाडी रोडवरील बाळेश्वरी नाका ते सिध्दार्थनगर दरम्यानचा रस्ता मागील ४ वर्षांपासून खराब असल्याने अनेक वेळा तक्रारी देऊनही राजकीय कारणाने रहिवाश्यांना त्रास होत असल्याचे तक्रारदारांचे मत आहे.
सिध्देश्वर नगर, अरिहंत नगर, पवार प्लॉट, सिध्दार्थनगर, बारबोले प्लॉट, साईनगरी, इंदिरा नगर आदी भागातील रहिवाश्यांना या रस्त्याचा वापर होतो. रोडे, धिसुबाई पुनमिया, मधुबाला तातेड यांसह अनेक नागरिकांना सदरच्या नादुरुस्त रस्त्यामुळे अपघात झाले आहेत. यापूर्वीही सांडपाण्याच्या गटारीसाठी तातेड यांनी नोटीस दिल्याने सदरच्या गटाराची दुरुस्ती करण्यात आली होती.
मागील चार वर्षापासून या रस्त्याची दुरूस्ती अथवा डागडुजी नगपरिषेच्या बांधकाम खात्याने केली. या परिसरातील नागरीकांनी लेखी तक्रार केली आहे.