बार्शी -: सेवा निवृत्त मिस्त्रीच्या थकीत पगाराच्या मागणीसाठी शासकीय कामात अडथळा आणल्याने रामचंद्र पवार यासह चोवीस जणांविरूद्ध पोलीसानी शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत येथील तालुका पंचायत समिती कार्यालयातील कक्ष अधिकारी श्रीमती स्मिता बाबर (वय ४७ रा.बार्शी) यांनी पोलीसांत फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, येथील पंचायत समिती कार्यालयात बुधवारी सकाळी साडे अकरा वाजता रामचंद्र मगर यांनी कक्षाधिकारी श्रीमती बाबर यांना पंचायत समितीकडील सेवानिवृत्त कर्मचारी रामचंद्र मगर याचा जानेवारी २०१३ चा थकीत पगार का अदा केला जात नाही असे म्हणून रामचंद्र पवार यासह चोवीस जणांनी पंचायत समितीच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप ठोकून येणार्या जाणार्यांना मज्जाव करत शासकीय कामात अडथळा आणला. पोलीसांनी पवारसह चोवीस जणांना तातडीने अटक केली. पुढील तपास फौजदार सुरेखा धस करत आहेत.