बार्शी -: लघु उद्योग व महिला बचत गटांना अथर्सहाय्य उपलब्ध करण्याची बतावणी करून अंदाजे चाळीस वर्षीय महिला गल्लोगल्ली फिरून महिलांची फसवणूक करत असल्याने या महिलेची माहिती कळताच त्वरीत पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन बार्शी पोलीसांनी केले आहे.
शहरात मागील काही दिवसांपासून अर्धवट मान जळालेली तसेच हातीची वाकडे बोटे असलेली एक महिला शहरातील विविध ठिकाणी फिरुन वेगवेगळ्या नावांची आपली ओळख सांगत गरजू महिलांना, बचतगटांना व लघुउद्योग व्यवसायासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याची बतावणी करत महिलांकडून १०० रूपयांपासून मिळेल तितकी रक्कम घेत त्यांची फसवणूक करत असल्याचे निदर्शनास आले आहे. सदरच्या वर्णनातील महिलेकडून फसू नये या वर्णनाची महिला आढळल्यास नागरीकांनी त्वरीत बार्शी पोलीस ठाण्याशी दूरध्वनी क्रमांक २२३३३३ येथे संपर्क साधावा असे आवाहन बार्शी पोलिसांनी केले आहे.