बार्शी -: येथील मनीषा प्रवीण कसपटे (वय २४ रा. गोरमाळे, ता. बार्शी) हिचे नुकतेच लग्न झाले होते. लग्नानंतर प्रथमच माहेरी आल्यानंतर बाथरुममध्ये ओढणीने गळफास लावल्याने खळबळ निर्माण झाली आहे.
गोरमाळे (ता. बार्शी) येथील सिताफळ उत्पादक संघाचे अध्यक्ष तसेच नवनाथ मल्हारी कसपटे यांचा मुलगा प्रवीण याच्याशी दि. ५ फेब्रुवारी २०१३ रोजी येथील स्वयंवर मंगल कार्यालयात झाला होता. लग्नात हत्तीवरुन वरात काढल्याने तसेच मोठा खर्च व गाजावाजा करत झालेल्या लग्नाची मोठी चर्चा होती. परंतु केवळ आठ दिवसांत नववधूच्या मृत्यूने अनेकांच्या मनात मोठ्या शंका निर्माण झाल्या आहेत.
राजेंद्र ज्ञानदेव बनसुडे रा. तडवळे (या.) सध्या रा.गोंदील प्लॉट यांची लाडात वाढलेली दुसरी मुलगी असलेल्या मनिषाने माहेरी आल्यावर बाथरुममध्ये असलेल्या शॉवरला ओढणीने गळफास लावल्याने तिच्या घरच्यांनी टाहो फोडला व जगदाळे मामा रुग्णालयात दाखल केले. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. पवार यांनी मनिषाचा मृत्यू अगोदरच झाल्याचे सांगत सदरची घटना बार्शी पोलिसांना कळविली. पोलिसांकडून मयत मनिषाचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदनासाठी नेल्यावर प्राथिमक अहवालात गळफासाने मृत्यू झाल्याचे समजले आहे. सदरच्या प्रकरणी अधिक माहिती देण्याच्या मनस्थितीत माहेरच्या व्यक्ती नसल्याने तपास अधिकारी सौ. पडवळ यांनी आणखी माहिती सध्या उपलब्ध नसल्याचे सांगीतले.