उस्मानाबाद -: कम्बाईड डिफेन्स सर्व्हिसेस या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या व स्पेशल एंट्री द्वारे सैन्यदलात अधिकारी होऊ इच्छिणा-या महाराष्ट्रीयन युवकाकरिता शॅर्ट सर्विस कमिशन परीक्षेच्या मुलाखतीच्या तोंडी परीक्षेच्या पुर्व तयारीसाठछी छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र, विभागीय महसूल आयुक्त कार्यालय आवार, नाशिक रोड, नाशिक येथे १० दिवसांचे मोफत प्रशिक्षण शिबीर चालविले जाणार आहे. या प्रशिक्षण शिबीराचा कालावधी दिनांक २१ फेब्रुवारी ते २ मार्च २०१३ आणि दिनांक १२ मार्च ते २१ मार्च असा आहे. तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी प्रशिक्षण वर्गात प्रवेश घेण्यासाठी दिनांक २० फेब्रुवारी किंवा ११ मार्च रोजी दुपारी ३ वाजता या प्रशिक्षण केंद्रावर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रशिक्षण कालावधीत निवास व प्रशिक्षणाची सोय महाराष्ट्र शासनातर्फे मोफत केलेली असून भोजनासाठी प्रति दिवस रुपये ५० प्रमाणे अतिरिक्त शुल्क आकारण्यात येईल. मुलाखतीस येताना मुलाखतीचे पत्र ( प्राप्त झाले असल्यास ), लेखी परिक्षेचे कॉल लेटर किंवा स्पेशल एंट्री द्वारे एसएसबी करीता अर्ज पाठवले बाबतचा पुरावा, सैन्यदलामध्ये अधिकारी पदासाठी रोजगार समाचार पत्रानुसार टेक्नीकल/ मेडीकल किंवा इतर अधिकारी पदासाठी अर्ज केले असल्यास अर्जाची छायांकित प्रत सोबत ठेवावी, एन. सी. सी. सर्टिफिकेट असल्यास, एन. डी.ए. मधील परिक्षा उत्तीर्ण असल्यास पुरावा सोबत ठेवावा.
उमानाबाद जिल्हयातील पात्र उमेदवारांनी वरील प्रशिक्षण वर्गाचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, उस्मानाबाद यांनी केलेले आहे. अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक या कार्यालयाच्या दुरध्वनी क्रमांक ०२५३/२४५१०३२ वर संपर्क साधावा.