सोलापूर :- जिल्हा नियोजन समितीची निवडणूक दि. १४ फेब्रुवारी २०१३ रोजी होणार असुन मतदानाची वेळ सकाळी ८.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत आहे.
सदर निवडणूक गुप्त मतदान पध्दतीने घेण्यात येईल व प्रतिनिधी मार्फत मते घेतली जाणार नाहीत. मतदारास प्रत्येक मतदार संघातुन प्रत्येक प्रवर्गातुन निवडणूकीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या संख्येइतके पसंतीक्रम देता येतील व एका उमेदवारास एका पेक्षा अधिक पसंतीक्रम देता येणार नाही. मतदाराने पसंतीक्रम जेवढे द्यावयाचे आहेत ते मधील संख्या न वगळता देणे आवयक आहे. जर पसंतीचाक्रम वगळल्यास किंवा सारखाच पसंतीक्रम एका पेक्षा अधिक उमेदवारांना दिल्यास त्या व त्यापुढील पसंतीक्रमाच्या मोजणीसाठी त्या मतपत्रिकेचा विचार केला जाणार नाही. पहिला पसंतीक्रम कोणाही उमेदवारास न दिल्यास किंवा एका पेक्षा अधिक उमेदवारास दिल्यास अशी मतपत्रिका बाद होईल.
मतदाराने उमेदवाराच्या नावापुढे दिलेल्या कंसामध्ये पसंतीक्रम अंकामध्ये मराठी किंवा इंग्रजीमध्ये नमुद करणे आवश्यक आहे. अक्षरामध्ये नमुद केलेले पसंतीक्रम मतमोजणीसाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत. पसंतीक्रम हे प्राधिका-यांनी त्यासाठी पुरविण्यात आलेल्या साधनानेच नमुद करणे आवश्यक आहे व अन्य साधनाने नमुद केलेले पसंतीक्रम मोजणीसाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत.
निरक्षरतेमुळे किंवा अंधत्वामुळे अथवा इतर शारिरिक अपंगत्वामुळे एखादा मतदार मतपत्रिकेवरील नांवे वाचण्यास अथवा मदतीशिवाय त्यावर पसंतीक्रम नमुद करण्यास असमर्थ असेल तर मतदान केंद्राध्यक्ष मतपत्रिकेवरील त्यांच्यावतीने आणि त्याच्या इच्छेनुसार पसंतीक्रम नमुद करण्यासाठी आणि आवश्यक असल्यास पसंतीक्रम न दिसेल अशारितीने मतपत्रिकेची घडी घालण्यासाठी आणि ती मतपेटीत टाकण्यासाठी मतदारांच्या यादीतील मतदाराव्यतिरिक्त १८ वर्षाहुन कमी वय नसणा-या एखाद्या सोबत्याला त्याच्या बरोबर मतदार कक्षांकडे नेण्यासाठी मतदारास परवानगी असेल. असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.