बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : शिवजन्मोत्सवानिमित्त पानगाव (ता. बार्शी) येथील एन्जॉय ग्रुपच्यावतीने ग्रामीण भागातील सामाजिक कार्याबद्दल राजेंद्र मिरगणे यांना रयत सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
गुरुवार दि.21 रोजी पानगाव येथे ह.भ.प.डॉ.जयंत करंदीकर यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर पानगावचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दत्तात्रय नाना काळे, माजी पोलीस निरीक्षक नानासाहेब कदम, प्रा.अशोक सावळे, महेश वाघमारे, विकास पाटील, बाबासाहेब पाटील, भारत पवार, अतुल जगदाळे, बाळासाहेब गव्हाणे, पिंटू नाईकवाडी, सुहास मोहिते, सौ. शिवपुरे आदीजण उपस्थित होते.
यावेळी बोलतांना राजें मिरगणे यांनी म्हटले एन्जॉय हे नांव ऐकून मजा करणारे युवक असा आपला समज होईल परंतु सुख:दुखात, अडचणीत व त्रासदायक परिस्थितीत विचारपूर्वक मार्ग काढणार्या, कलयुगातील दु:खाच्या डोंगराने खचून न जाता उभारी देण्यास तयार असलेल्या तरुणांनी प्रत्येक परिस्थितीत एन्जॉय म्हणजेच त्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण करण्यासाठी या ग्रुपचे नाव एन्जॉय ठेवले आहे. मला हा पुरस्कार नाविण्यपूर्णआहे. मी या पुरस्काराचा कितपत दावेदार आहे वा हा घेण्यास पात्र आहे का हे या क्षणी सांगता येणार नाही. माझी समाजातील विविध लोकांसाठी काहीतरी धडपड करण्यास आत्ताच कुठे सुरुवात झाली आहे. परंतु या पुरस्काराने मला निश्चितच बळ मिळेल व भविष्यात खूप चांगले काम करण्यासाठी कटिबध्द आहे. मी कोणत्याही घोषणा अथवा वार्यावरच्या गोष्टी करणार नाही. भविष्यातील लोकोपयोगी गोष्टींचे प्लॅनिंग करुन तळागाळातील गरीबासाठी मला काम करायचे आहे कारण मी देखिल गरीब कुटूंबातून स्वकष्टाने थोडेफार यश संपादन केले आहे. यामुळे सामाजिक बांधीलकीची जबाबदारी स्वीकारुन उपक्रम सुरु करत आहे
यावेळी दत्तू नाना काळे, भारत पवार, अशोक सावळे, ह.भ.प.जयंत करंदीकर यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विनोद फावडे, सूरज मोरे, विश्वजीत चौगुले, युन्नूस शेख, आकाश जाधव, अतुल जगदाळे, किशोर काळे, संतोष जाधव, धनाजी मोरे, कुमार कानगुडे यांनी परिश्रम घेतले. संतोष कानगुडे यांनी सूत्रसंचलन केले तर चेतन मोरे यांनी आभार मानले.