नळदुर्ग -: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने इयत्ता बारावीच्या परीक्षेला दि. 21 फेब्रुवारी रोजीपासून सुरुवात झाले असून नळदुर्ग येथील येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा सुरु आहे.
नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर बारावीची परीक्षा शांततेत सुरु असून या परीक्षा केंद्रावर कॉपीसारख्या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पेशवे हे प्रयत्नशील आहेत. प्राचार्य पेशवे यांनी कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा व्हाव्यात याची खबरदारी घेतली असल्याने या परीक्षेत विद्यार्थी कुठल्याच प्रकारचा अनुचित प्रकार करताना आढळला नाही. त्यामुळे या परीक्षा केंद्रावर कॉपीमुक्त अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याची चर्चा आहे. या परीक्षा कला, विज्ञान व वाणिज्य शाखेबरोबरच किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमाचे एकूण 550 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. केंद्र संचालक म्हणून एन.एम. जाधव हे काम पाहत आहेत. परीक्षा केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.