उस्मानाबाद -: उस्मानाबाद जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी हितगुज करण्यासाठी व विविध विषयावर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आज दि. 23 फेब्रुवारी रोजी उस्मानाबाद येथे आगमन होणार आहे. सकाळी अकरा ते एक वाजण्याच्या दरम्यान राज ठाकरे हे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी शिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात चर्चा करणार आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यातील पक्ष कार्याचा प्रमुख पदाधिका-याकडून ते आढावा घेणार आहेत. त्यानंतर एक तासाची वेळ राखीव असून त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधणार आहे. दुपारी साडे तीन वाजेपर्यंत राज ठाकरे उस्मानाबाद थांबणार असून त्यानंतर ते आपल्या पुढील दो-यावर रवाना होतील.