सोलापूर -: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने सुरु असलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत शनिवारी इंग्रजी विषयाच्या पेपरला भरारी पथकाने कॉपी प्रकरणी  ८ विद्यार्थ्यांवर कारवाई केली.
      यामध्ये येडव ता. मंगळवेढा येथील आश्रमशाळा, उमा कनिष्ठ महाविद्यालय मोडनिंब, कला वाणिज्य महाविद्यालय माढा व उपरी ता. पंढरपूर येथील अजितदादा पवार महाविद्यालयातील प्रत्येकी 1 विद्यार्थ्याचा तर सोड्डी ता. मंगळवेढा येथील एम.पी. मानसिंग हायस्कूल व जवळा ता. सांगोला येथील वत्सलादेवी कनिष्ठ महाविद्यालयातील प्रत्येकी 2 विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली.
         या कारवाईमध्ये मंडळाचे सदस्य चव्हाण, सतिश दरेकर, विस्तार अधिकारी (माध्यमिक) राजशेखर नागणसुरे, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) मदारगणी मुजावर,  तसेच माध्यमिक शिक्षणाधिकारी जगन्नाथ शिवशरण यांनी सहभाग नोंदवीला. विशेष म्हणजे इंग्रजी विषयाच्या पेपरचे व्हिडीओ चित्रीकरणही करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांच्‍या मार्गदर्शनाखाली यापुढेही कॉपी विरोधी अभियान प्रभावीपणे राबविणार असल्याचे शिवशरण यांनी सांगितले.
 
Top