सांगोला (राजेंद्र यादव) :- सांगोला तालुक्यातील शेवटच्या टोकाचं गाव म्हणजे चोपडी, या बुध्देहाळ तलावाचा आधार, पण गेली दोन वर्षे पावसाने हुलकावणी दिल्याने या तळ्याचा आधार पुर्णपणे निसटला. थोड्या फार पाण्यावर इथला शेतकरी बागायती शेती करू लागला. डाळींबाच्या फळाने या गावाला बर्यापैकी साथ दिली परंतु डाळींबाच्या फळाला तेल्या रोगाने घेरल्याने इथला शेतकरी हतबल झाला. काहीतरी वेगळं करण्याची अनेकांची ऊर्मी असते. अशा ऊर्मीतुनच चोपडी येथील शेतकरी बाळासाहेब तुकाराम यादव यांनी तीन वर्षापुर्वी सांगलीतुन ग्रे फ्रुटची झाडे विकत आणली. आता बारा ते अठरा फळांनी ते झाड बहरले असुन पुणे, मुंबई येथील बाजारपेठेत या फळाला चांगला भाव आहे.
शेतीत काहीतरी वेगळं करून त्यातुन कमी खर्चात उत्पंन्न कसे घेता येइल याचा सतत विचार करणारे चोपडील बाळासाहेब यादव हे एक शेतकरी. त्यांनी सांगली येथुन ग्रे फ्रुट ज्याला मराठीत पपनस असे म्हणतात. त्याची १०० रोपे ७२ रू. प्रमाणे विकत आणली. प्रत्येक झाडाला पाच किलो या प्रमाणात त्यांनी शेणखत घातले. दोन ते अडीच वर्षानंतर त्याला फळे येऊ लागली तेंव्हा पाण्याची कमतरता भासु लागली. त्यावेळी त्यांनी चार दिवसातुन एकदा पाण्याचा टँकर विकत घेऊन त्या फळबागेला जगवलं. आता प्रत्येक झाडाला बारा ते अठरा इतक्या प्रमाणात फळे आहेत. पुणे येथील बाजारपेठेत ३० ते ४० रू किलो या दराने हे फळ विकले जाते तर मुंबई येथे ५० ते ६० रू प्रमाणे फळ विकले जाते.हे फळ गोड व नारंगी रंगाचे आहे, या फळाचे झाड साधारण ५-६ मीटर उंचीचे असते, ह्याची पाने गडद हिरव्या रंगाची व ६ इंचा पर्यत लांब असतात. या फळामध्ये भरपुर प्रमाणात न्युटृीन व फायटो केमीकल असल्यामुळे ते शरीरास अत्यंत उपयूक्त आहे. तसेच सी जीवनसत्वाची मात्रा जास्त प्रमाणात आहे. या फळाचे तेल ऍरोमाथेरपीसाठी उपयोगी असुन कॅन्सर वरील उपचारावर हे फळ अतिशय गुणकारी आहे. प्रत्येक फळाचे वजन ७०० ते ८०० ग्रॅम आहे. संपुर्ण भारतात या फळाचे १ लाख ८० हजार टन उत्पादन घेतले जाते. आपल्या महाराष्ट्रात अगदी तुरळक ठिकाणी हे फळ लागवडी खाली असुन सोलापुर जिल्ह्यातील अतिशय दुष्काळी भागात या फळाची लागवड केली गेल्याने या परीसरातील शेतकरी हे फळ पाहण्यासाठी येत असतात.