सांगोला (राजेंद्र यादव) -: एका सेवानिवृत्त कर्मचा-याने सात हजार रुपये रोख, आधारकार्ड, एटीएम कार्ड, बँक पासबुक असलेले पॉकीट स्टेट बँकेच्या सुरक्षा रक्षकाला सापडले. ते त्यांनी प्रामाणिकपणे आपल्या अधिका-यांकडे सुपुर्त केले. त्याबदल बँकेतर्फे या सुरक्षा रक्षकाचा सत्कार करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, मिरज रोडला राहणारे पाटबंधारे खात्यातील सेवानिवृत्त कर्मचारी धोंडीराम मारुती हराळे हे काही कामानिमित्त शहरात आले होते. आपली खरेदी झाल्यानंतर मोबाईल सापडत नसल्याने ते आपल्या पिशवीतील साहित्य तपासत स्टेट बँकेच्या पाय-यांजवळ बुधवारी सायंकाळच्या वेळी बसले होते. तेंव्हा मोबाईल पिशवीतच सापडला. परंतु पिशवीतील पाकीट मात्र यावेळी तेथे पडले. या पाकीटात सात हजार रुपये, एटीएम कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक आदी होते. घरी गेल्यानंतर आपले पाकीट हरवल्याचे हराळे यांच्या लक्षात आले. त्यांनी शहरात परत येऊन ब-याच ठिकाणी पाकीट शोधले. परंतु ते सापडले नाही. गुरुवारी साडे आठ वाजण्याच्या दरम्यान डयुटीवर असलेले बँक सुरक्षा रक्षक वसंत धुळा आगलावे यांना पायरीच्या आसपास हे पाकीट सापडले. त्यांनी सदरचे पॉकीट बँकेचे मॅनेजर व्ही.डी. तारळेकर यांच्याकडे सुपुर्त केले. त्यांनी त्यातील कागदपत्रे तपासून मिळालेल्या मोबाईल नंबरशी संपर्क साधला असता, हराळे यांनी आपले पॉकीट हरविल्याचे मान्य करुन त्यातील साहित्याची व रोख रक्कमेची ओळख पटविली. त्यानंतर हराळे यांना बँकेत बोलावून त्यांना हे पॉकीट परत देण्यात आले. तसेच बँक सुरक्षा रक्षक वसंत आगलावे यांच्या प्रामाणिकपणाबदल मॅनेजर व्ही.डी. तारळेकर, शिवाजीराव पवार, पी.व्ही. कांबळे व इतर कर्मचा-यांच्या उपस्थितीत बँकेच्यावतीने सत्कारही करण्यात आला.