बार्शी – नातवाच्या घरी निघालेल्या आजोबाला बार्शी बसस्थानकावरुन रिक्षाचालकाने आणखी दोघांच्या मदतीने गावाबाहेर नेवून त्यांच्या जवळची रक्कम हिसकावून त्यांना मारहाण केली. ही घटना बुधवार रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान बार्शी येथे घडली. याप्रकरणी पोलीसानी तपासाची चक्रे फिरवून दोन आरोपींना गजाआड केले. यातील एक आरोपी फरार झाला आहे.
    रामराव दोडके (वय ७० वर्षे, रा. निरा, ता. खंडाळा, जि. सातारा) असे मारहाण झालेल्या वृध्दाचे नाव आहे. हरिभाऊ केशव कसबे (वय ६५, रा. मांगडे चाळ, बार्शी), गणेश बापू पवार (वय २८, रा. फपाळवाडी रोड, बार्शी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत. यातील रामराव दोडके हे बार्शी येथील लहूजी वसद चौक, सुभाषनगरमध्ये वास्तवयास असलेल्या ननवरे (नातेवाईक) यांच्या घराकडे जाण्यासाठी रिक्षास बसले व प्रवाशी भाडे ठरविले. सदरच्या रिक्षात रिक्षाचालकाचा आणखी एक जोडीदार होता. रिक्षाचालकाने यांच्या पोलीस स्टेशनला वळसा घालत परत बसस्थानकाकडे आणल्यावर दोडके यांनी परत इकडे कशाला आणले, असे विचारले असता त्यावेळी त्याना रिक्षाचालकाचे नातेवाईक आजारी असल्याचे सांगत त्यानाही घेऊन जाायचे असल्याचे सांगितले व रिक्षा तुळजापूर रोडला नेली.   
    रिक्षा मार्केट कमिटीच्या गेटसमोर आल्यावर रिक्षाचालक व त्याचा साथीदार यांनी नगराध्यक्ष तांबोळी यांच्या भावाचया एम.के. ट्रेडर्स या दुकानाबाहेर झोपलेल्या आणखी एका साथीदाराला बरोबर घेतले व तुळजापूर रोडकडे रिक्षा नेली. सदरची रिक्षा रेल्वेच्या पुलाजवळून जाताना गावाबाहेर आपणाला नेण्यात येत असल्याचे लक्षात आल्यानंतर दोडके यांनी मोठयाने आरडाओरड सुरु केली. यावेळी रिक्षावाल्याच्या दोन्ही साथीदारांनी दोन्ही बाजूने हाताच्या कोप-याने छातीत मारण्यास तसेच नरडे आवळत तोंड दाबण्यास सुरुवात केली. त्यांच्या जवळ असलेल्या 3200 रुपये हिसकावून घेऊन तेथून तिघे आरोपी पसार झाले.
    याप्रकरणी पोलीसानी दोघा आरोपीस अटक केली असून एक आरोपी अदयाप फरार आहे.
 
Top