नळदुर्ग -: काटगाव (ता. तुळजापूर) शिवारात शेतात ट्रक्टर अंगावरुन गेल्याने जखमी होऊन एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नळदुर्ग पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगल तुकाराम शिंगाडे (वय २८ वर्षे, रा. डोईफोडवाडी, ता. गेवराई) असे मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे. तर बबन बोरकर (रा. मालेगाव, ता. देवराई) असे गुन्हा दाखल झालेल्या टॅक्टर चालकाचे नाव आहे. यातील मंगल शिंगाडे ही काटगाव (ता. तुळजापूर) शिवारातील सिध्देश्वर कस्तुर यांच्या शेतात असलेल्या ऊसाच्या फडात झोपली असताना बबन बोरकर याने त्याच्या ताब्यातील ट्रक्टर (क्र. एमएच २३ टी ४४७७) हयगयीने व निष्काळजीपणे चालवून मंगल हिच्या अंगावर घातली. यात मंगल शिंगाडे ही गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रक्टर चालकाविरूद्ध नळदुर्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड हे करीत आहेत.