स्मानाबाद :- दहशतवाद विरोधी पथक, महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी इंडियन मुजाहिदीन संघटनेच्या सक्रीय सदस्य असलेल्या ४ आरोपींची उपयुक्त माहिती देणाऱ्यास १० लाख रुपयांचे इनाम जाहीर केले आहे.अहमद सिद्दीबाप्पा मोहम्मद झरार ऊर्फ यासीन भटकल ऊर्फ अहमद ऊर्फ इमरान ऊर्फ शाहरुख, तहसीन अख्तर वसीम अख्तर शेख ऊर्फ मोनू  ऊर्फ हसन, असदुल्लाह अख्तर ऊर्फ हड्डी ऊर्फ तबरेज ऊर्फ शाकीर ऊर्फ डॅनिअल आणि वकास ऊर्फ अहमद अशी या  आरोपींची नावे आहेत. दहशतवाद विरोधी पथकाने या आरोपींची छायाचित्रेही जारी केले आहेत.
      या आरोपींचा मुंबई, पुणे आणि महाराष्ट्रात इतरत्र तसेच महाराष्ट्राबाहेरील ठिकाणी घडलेल्या बाँबस्फोटाच्या गुन्ह्यात सहभाग आहे. या आरोपींची उपयुक्त माहिती असणाऱ्यांनी दहशतवाद विरोधी पथकाच्या 022-23791619 आणि 09619122222 आणि 08652012345 या क्रमांकावर अथवा  atswantedaccused@ gmail.com  आणि  atswantedaccused@ yahoo.co.in या संकेतस्थळावर कळविण्याचे आवाहन दहशतवाद विरोधी पथकाचे अपर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी  केले आहे.  ****
 
Top