तुळजापूर -: श्री बारालिंग सांप्रदायिक भजनी मंडळ, तुळजापूर यांची माघवारी दिंडी पंढरपूर कडे दि. १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता नागनाथ मंदीर, वेताळ नगर, तुळजापूर येथून भाविक भक्तासह श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. ही दिंडी मसला खुर्द, काटी, शेळगाव, कळमण, डिकसळ, यावली सारोळा तुगंत, नारायण चिंचोली मार्ग पंढरपूर येथे २० फेब्रुवारीला पोहचेल.
            मुक्कामी गावे पुढीलप्रमाणे आहेत. दि. १६ रोजी काटी किर्तनकार ह.भ.प. अशोक महाराज, १७ रोजी कळमण येथे नरसिंग महाराज, दि. १८ रोजी यावली येथे प्रभाकर महाराज, दि. २१ रोजी योगेश महाराज व दि. २२ रोजी बलभिम ऊर्फ भिमसेन महाराज यांचे किर्तन होईल. या पायी दिंडीत सहभागी होण्याचे आवाहन बारालिंग सांप्रदायिक भजनी मंडळाने केले आहे.
 
Top