उस्मानाबाद : ग्रामपंचायत पिंपळवाडी येथे नुकताच सांस्कृतिक कला महोत्सव पार पडला. पर्यावरणाचे संरक्षण, वातावरणातील बदल आणि स्त्रीभ्रूण हत्या या विषयांवर विविध कलापथकांनी भाग घेतला. राज्याच्या विविध भागातून ५४ कलापथकांनी या ठिकाणी आपली कला सादर केली. जिल्ह्यातील आदर्श लोकजागृती कला मंडळ (गोरेवाडी) आणि जयभवानी बहुउद्देशीय आराधी मंडळ यांनीही या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृती केली. वाशी पंचायत समिती सभापती लक्ष्मीकांत आटोळे, सरपंच परसराम गव्हाणे, तहसीलदार एस.डी.शिंदे, पोलीस पाटील हारुन काझी आदि प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.  
    शाहीर राणा जोगदंड, काकासाहेब मोरे, सर्जेराव इंदलकर, यशवंत पवार, रामराव उंदरे, शाहीर असलगावकर, शाहीर जाधव, गणेश पाटील आदिंची उपस्थिती होती.
 
Top