
उमरगा तालुक्यातील मुरुम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात 70 लाख रुपये खर्चून 24 गाळ्यांचे व्यापारी संकुलन बांधण्यात आले आहे. या संकुलाचा उदघाटन सोहळा दि. 28 फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील-चाकूरकर यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण, राज्याचे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील,औसाचे आमदार बसवराज पाटील यांची उपस्थिती राहणार आहे. बाजार समितीकडून जय्यत तयारी करण्यात येत असून आडत आणि खरेदीदार व्यापार्यांनी कार्यक्रमासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील यांनी केले आहे.