नळदुर्ग (भैरवनाथ कानडे) - 'तुळजापूर लाईव्ह' ऑनलाईन ई-न्यूज पेपरचे मुख्य संपादक शिवाजी नाईक यांना काव्यमित्र पुणे यांचा ‘राज्यस्तरीय युवाचेतना पुरस्कार’ डॉ. बी.टी. बधान अप्पर सहकार आयुक्त महाराष़्ट्र राज्य मुंबई यांच्या हस्ते प्रसिध्द कवींच्या काव्य मैफिल कार्यक्रमात देऊन गौरविण्यात आले.
महाराष्ट्रात विविध क्षेत्रात काम करणा-या दिग्गज व्यक्तींना काव्यमित्र पुणे यांच्यावतीने राज्यस्तरीय युवाचेतना पुरस्काराने दरवर्षी गौरविण्यात येते. दि. ३ फेब्रुवारी रोजी पुणे येथील भोसरीच्या कै.अंकुशराव लांडगे नाट्यगृहामध्ये प्रसिध्द कवींच्या काव्य मैफील या कार्यक्रमामध्ये राज्यातील दिग्गज व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यात नळदुर्ग येथील पत्रकार शिवाजी नाईक यांनाही हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे अप्पर सहकार आयुक्त डॉ.बी.टी. बधान यांच्या हस्ते व प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर रणनवरे, शिवांजली ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजीराव चाळक, मावळ तालुका प्रा.शि. पतसंस्थेचे चेअरमन संतोष गायकवाड, पिंपरीचिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक संजय वाबळे, काव्यमित्र संस्थेचे राजीव सगर, कवी सचिन काळे यांच्यासह अनेक कवी, साहित्यिक व प्रतिष्ठितांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले. शिवाजी नाईक यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री तुळजाभवानी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन सुनील चव्हाण, दै.सकाळ सोलापूरचे वृत्तसंपादक अभय दिवाणजी, प्राचार्य डॉ. सुहास पेशवे, डॉ.महेश शिंदे, पत्रकार भैरवनाथ कानडे, पांडुरंग पोळे, विनायक अहंकारी, विजयकुमार पाटील, रिपाइंचे तालुकाध्यक्ष एस.के. गायकवाड, महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघ तुळजापूर तालुकाध्यक्ष दादासाहेब बनसोडे, डॉ.दीपक जगदाळे, विजयकुमार सुरवसे, पत्रकार चंद्रसेन देशमुख, रणजित दुरुगकर, श्रीराम क्षिरसागर, भिकाजी जाधव, यमगरवाडी प्रकल्पाचे विश्वस्त उमाकांत मिटकर, डॉ.सचिन पाटील, सुनिल पवार, महाराणा प्रताप सामाजिक संस्थेचे सचिव मनीष हजारे, वरिष्ठ अभियंता सुभाष नाईक, प्रशांत देशमुख, गोपाळ सुरवसे आदीनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिले आहे.