नळदुर्ग - हुशार मुत्सदी आणि हजरजबाबी नेता असे महाराष्ट्राचे शिल्पकार स्व.यशवंतराव चव्हाण यांची ओळख सर्वश्रूत आहे. भारतीय राजकारणतला एकमेव नेता म्हणून उल्लेख करण्यात येणारे यशवंतराव चव्हाण हे आपल्या राजकीय कारकिर्दीत एकही अपशब्द न वापरता राजकारण केले, असे सांगून विद्यार्थ्यांनी यशवंतराव चव्हाण यांचा अभ्यास करुन आपले जीवन सत्करणी लावण्याचे आवाहन विचारवंत व जेष्ठ पत्रकार मधुकर भावे (मुंबई) यांनी केले.
नळदुर्ग येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित व्याख्यानात मधुकर भावे हे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालाघाट शिक्षण संस्थेचे सचिव तथा माजी आमदार नरेंद्र बोरगांवकर हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार सि.ना. आलुरे गुरुजी, वृत्तसंपादक अभय दिवाणजी हे उपस्थित होते. तर व्यासपीठावर पत्रकार शिवाजी नाईक, भैरवनाथ कानडे, संस्थेचे संचालक देविदास राठोड, स्वातंत्र्य सैनिक जर्नाधन होर्टीकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शफी शेख, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रा.जावेद काझी, अख्तर काझी आदीजण उपस्थित होते. प्रमुख मान्यवरांचा सत्कार प्राचार्य डॉ.एस.डी.पेशवे, उपप्राचार्य प्रा.एन.एम. माकणे, डॉ. उमाकांत चनशेट्टी यांनी केले.
मधुकर भावे बोलताना यावेळी म्हणाले, १९६५ चे युध्द आपण जिंकलो कारण यशवंतरावांनी हा देश आपला आहे हे प्रत्येकाला दाखवून दिले. आज ती परिस्थिती राहिली नाही कारण आज प्रत्येकजण आपलाच विचार करत आहे. ७ जानेवारी १९५२ ला पहिली निवडणुक यशवंतराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी टी.व्ही. मोबाईल, रेडिओ, वीज, वर्तमानपत्रे आदी साधने ग्रामीण भागात नव्हती. त्यामुळे लोक अडाणी होते. तरी त्या निवडणुकीत ६६.४२ टक्के लोकांनी मतदान केले. आज आपला देश इतका प्रगत झाला आहे. तरी २००९ च्या निवडणुकीत फक्त ४६ टक्के मतदान झाले. देश शिकलेला नव्हता तेंव्हा शहाणा होता, देश शिकला अन् परिस्थिती बिघडली. पन्नास वर्षापूर्वी आपला देश काय होता व आज काय परिवर्तने झाले, याचा विचार कोणीच करत नाही. लोक फक्त एकमेकांना नावे ठेवण्यात मग्न आहेत. पूर्वीचे अशिक्षित माणसे शहाणी होती, आताची शिकलेली माणसे अतिशहाणी असल्याची टीका करुन ते पुढे म्हणाले की, आज प्रत्येकांनी यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याचा व त्यागाचा अभ्यास करणे गरजेचे आहे. यशवंतरावाचे राज्य आणायचे असेल तर कार्यकर्त्यांनी आपल्या रक्ताचे पाणी करुन काम करणे गरजेचे आहे. तरच जीवनाचे सार्थक होईल. याप्रसंगी त्यानी पत्रकारावर टीका करताना सांगितले की, आज पत्रकार हा ९० टक्के काम हे नकारात्मक करीत आहे. १० टक्के कामच ते सकारात्मक करीत आहे. पूर्वी बातमीला आई म्हणत काम केले जायचे, आज बातमी द्यायला पेड न्युजच्या नावाखाली पत्रकारीता वेगळ्या दिशेने भरकटत चालली आहे. साने गुरुजींचे आदर्श घेऊन सि.ना. आलुरे गुरुजी, त्यांचे सहकारी नरेंद्र बोरगांवकर, ना. मधुकरराव चव्हाण यांना यशवंतराव चव्हाण कळाले म्हणून त्यांनी शिक्षणाची गंगा ग्रामीण भागापर्यंत आणली. म्हणून आज मुलांबरोबर मुलींना शिक्षण घेणे सोयीचे झाले. आज यशवंतरावामुळेच ५० टक्के महिला प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असल्याचे पहावयास मिळत आहे.
या कार्यक्रमास कॉंग्रेस सेवा दलाचे शहराध्यक्षविनायक अहंकारी, शिवसेना तुळजापूर उपतालुका प्रमुख सरदारसिंग ठाकूर निवृत्त प्रा. बी.डी. माने, प्रा. अच्युतराव गोरे, प्रा. नामदेव जांभळे, प्रा. विलास देशमुख, भिमराव पाटील, नगसेवक अमृत पुदाले, मारुती बनसोडे, दयानंद काळुंके, प्रा.शिवाजी बनसोडे, सोमनाथ बनसोडे, प्रा.पांडुरंग पोळे, श्रीनिवास भोसले, अमित पाटील, डॉ.मोहन बाबरे, यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकतेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संतोष पवार यांनी केले तर आभार प्रा. आर.आर. कदम यांनी मानले.