
यावेळी संस्थेचे संस्थापक मुकूंद कुलकर्णी, दिनकर पाटील, रमेश मन्मथ करजखेडे, भास्कर जमादार हे उपस्थित होते. मंडळाच्या वतीने दरवर्षी जीवनगौरव पुरस्कार, भगवंत मित्रमंडळ हे मागील १३ वर्षांपासून पुणे येथे विविध सामाजिक उपक्रम राबवून पुणे येथील बार्शीकरांसाठी आत्मीयतेने काम करत असतांनाच सामाजिक विविध समाजोपयोगी उपक्रम राबिवत आहे. यावेळी बार्शीतीत राहूल जगदाळे यांची अधिकृत प्रतिनधी म्हणून निवड करण्यात आली.
भगवंत मित्रमंडळाने आजपर्यंत त्यांनी डॉ. आण्णासाहेब कश्यपी, अनंत दिक्षीत, श्रीमती प्रभाताई झाडबुके, डॉ.यादव, डॉ.नेने, डॉ.सामनगावकर, ह.भ.प. मांजरे महाराज, वायुपुत्र जगदाळे, भाऊसाहेब आंधळकर, अँड. गणपुले, सौ.डॉ.निंबाळकर, क्षीरसागर, उद्योजक भड यांना सन्ङ्कानीत केले आहे.
यावेळी बोलतांना करजखेडे यांनी म्हटले संस्थेच्या संकल्पना व उद्दीष्टांमध्ये समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा हा हेतू आहे, यापुढे आम्ही बार्शीतील पुणे येथे शिक्षणासाठी अथवा नोकरी, धंद्यासाठी स्थायीक झालेल्या पालकांचा मेळावा घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा व त्या सोडविण्याचा प्रयत्न करणार आहोत. या मंडळाच्या घटनेप्रमाणे बार्शीतील आमदार हा त्या मंडळाचा विद्यमान अध्यक्ष असतो, दरवर्षी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात या पुरस्काराचे वितरण केले जाते. यंदाच्या वर्षी समाजातील विविध क्षेत्रातील काम करणार्या व्यक्तींच्या प्रोत्साहनसासाठी आणखी विशेष पुरस्कार जाहीर करणार आहोत. या मंडळाला कोणत्याही प्रकाराचा राजकीय दबाव नाही, केवळ समाजाच्या उन्नतीसाठी सदैव तत्पर राहणारे हे मंडळ असून तरुणांनी या मंडळात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे अशी आमची इच्छा आहे. समाजाचे ऋण व्यक्त करण्याची संधी या निमित्ताने आम्हाला मिळत असल्याने त्यात आम्हाला मोठा आनंद मिळतो. प्रोत्साहनासाठी विशेष पुरस्कार देण्यात येणार त्याकरिता आपल्या कार्याचे स्वरुप व सविस्तर माहिती आमच्या ४ उमेदभवन, विवशाल टॉकीज समोर, पिंपरी पुणे १८, फोन ०२०-२७४२०६७० संपर्कावर पाठिवल्यास त्यांचा विचार केला जाईल.