सोलापूर -: दुय्यम कारागृह पंढरपूर येथील पोलीस कोठडीत रामा ब्रम्हदेव मेटकरी ४० वर्षे रा. सांगोला हे मयत झालेले आहेत. सदर घटनेची चौकशी करण्यासाठी जिल्हादंडाधिकारी सोलापूर यांनी उपविभागीय दंडाधिकारी, पंढरपूर यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
या घटनेसंबंधी ज्या कोणास काही लेखी अथवा तोंडी म्हणणे द्यावयाचे आहे त्यांनी दि. ६ फेब्रुवारी २०१३ पर्यंत कार्यालयीन वेळेत पंढरपूर विभागीय दंडाधिकारी कार्यालयात समक्ष हजर राहून लेखी निवेदन द्यावे सदर तारखेनंतर आलेल्या निवेदनाचा विचार केला जाणार नाही याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी असे उपविभागीय दंडाधिकारी, पंढरपूर विभाग, पंढरपूर यांनी कळविले आहे.