नळदुर्ग -: काव्यमित्र पुणे यांच्यावतीने 'तुळजापूर लाईव्ह' चे मुख्य संपादक शिवाजी नाईक यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल बालाघाट शिक्षण संस्थेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्यावतीने त्यांचा शिक्षण महर्षी तथा माजी आमदार सि.ना. आलुरे गुरुजी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालाघाट शिक्षण संस्थेचे सचिव तथा माजी आमदार नरेंद्र बोरगावकर तर प्रमुख अतिथी म्हणून मुंबई येथील जेष्ठ पत्रकार मधुकर भावे, माजी आमदार सि.ना. आलुरे गुरुजी, वृत्तसंपादक अभय दिवाणजी, स्वातंत्र्य सैनिक जनार्धन होर्टीकर गुरुजी, प्राचार्य डॉ. सुहास पेशवे आदीजण उपस्थित होते. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नळदुर्ग येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर महाविद्यालयाच्यावतीने सर्व प्रमुख अतिथीचे स्वागत करण्यात आले. नुकतेच पुणे येथे काव्यमित्र संस्थेच्यावतीने तुळजापूर लाईव्हचे मुख्य संपादक शिवाजी नाईक यांना राज्यस्तरीय युवाचेतना पुरस्कार म्हणून गौरवपत्र डॉ.बी.टी. बधान अप्पर सहकार आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या हसते मिळाल्याबद्दल त्यांचा संस्थेच्यावतीने शाल, पुष्पहार, श्रीफळ देवून सि.ना. आलुरे गुरुजी यांची सत्कार केले. यावेळी संस्थेचे संचालक देविदास राठोड, भिमराव पाटील, उपप्राचार्य एन.एम. माकणे, सांस्कृ्तिक विभागप्रमुख डॉ. उमाकांत चनशेट्टी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शफी शेख, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रा.जावेद काझी, शिवसेना तालुका उपप्रमुख सरदारसिंग ठाकुर, नगरसेवक अमृत पुदाले, यांच्यासह विद्यार्थी, प्राध्यापक मोठ्या संख्येनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा. संतोष पवार यांनी केले.