अफझल गुरुला फाशी देण्याच्या निर्णयावर ३ फेब्रुवारीलाच शिक्कामोर्तब झाले होते. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ३ फेब्रुवारीला त्याची दया याचिका फेटाळली. त्यानंतर कायदेशीर प्रक्रीयेचा अभ्यास करुन आजचा दिवस आणि वेळ फाशीसाठी निश्चित करण्यात आली.
राष्ट्रपतींनी दया याचिका फेटाळल्यानंतर ३ तारखेला सुशीलकुमार शिंदे यांनी ४ फेब्रुवारीला फाशीच्या फाईलवर स्वाक्षरी केली. त्यानंतर तुरुंग प्रशासनाने फाशीची तारीख आणि वेळ ठरविली. अफजल गुरुच्या कुटुंबियांना स्पीड पोस्टमार्फत फाशीचा निर्णय कळविण्यात आला. जम्मू आणि काश्मिर सरकारला विश्वासात घेण्यात आले. त्यानंतर अखेर आज अफजल गुरुला फासावर चढविण्यात आले.
अफजल गुरुला शुक्रवारी ८ फेब्रुवारीला फाशीबाबत माहिती देण्यात आली होती. त्यानंतर त्याला त्याची अंतिम इच्छा विचारली. त्याने कुराणाची प्रत मागितली. त्याच्याकडे स्वतःची एक प्रत होतीच. परंतु, त्याची अखेरची इच्छा म्हणून त्याला दुसरी प्रत देण्यात आली.
रात्री त्याच्यासाठी जेवणाचीही सोय करण्यात आली होती. अनेक पदार्थ त्याला देण्यात आले होते. परंतु, त्याने काहीही खाल्ले नाही. केवळ २-३ ग्लास पाणी पिले. रात्रभर तो झोपलाच नाही. त्यानंतर सकाळी ६ वाजता तुरुंग महानिरिक्षक, तुरुंग अधिक्षक, दंडाधिकारी आणि डॉक्टरांचे एक पथक तुरुंगात पोहोचले. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली. सर्वकाही ठिक होते. परंतु, फाशीपूर्वी अफजल गुरु काहीसा घाबरला होता. अखेरच्या क्षणी तो बिना कॉलरचा एक कुर्ता घालून होता. डॉक्टरांनी त्याला ८ वाजता मृत्ा घोषित केले. त्यानंतर सरकारने याबाबत अधिकृत घोषणा केली. तसेच शवविच्छेदन केल्यानंतर त्याला तिहार तुरुंगातच दफन करण्यात आले.

* सौजन्य दिव्यमराठी