नळदुर्ग -: सव्वा महिन्यापासून थकीत वीज बिलापोटी नळदुर्ग शहरातील पथदिव्याचा महावितरणने वीजपुवठा खंडीत केल्याने संपूर्ण शहर काळोख्यात असून दुष्काळात तेरावा म्हटल्याप्रमाणे शुक्रवार दि. ८ फेब्रुवारीपासून पाणीपुरवठ्याची थकबाकीमुळे वीज महावितरणने वीजपुरवठा तोडल्याने शहरावासियांतून नगरपालिकेच्या गलथान कारभाराचा तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
नळदुर्ग शहरातील वीजपुरवठा महावितरणने थकीत वीज बिला पोटी खंडीत केल्यामुळे पथदिवे सव्वा महिन्यापासून बंद अवस्थेत असल्याने शहर काळोख्यात बुडाले असतानाच शुक्रवार पासून नळदुर्ग शहराला पाणीपुरवठा करणा-या बोरी धरणावरील जॅकवेल सहीत शहरातील काही विंधन विहीरीचे वीज तोडली आहे. त्यामुळे चार दिवसाआड पाणीपुरवठा होत असताना त्यात वीज कनेक्शन तोडल्याने पाण्यासाठी नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.
नळदुर्ग नगरपालिकेकडे माहे एप्रिल ते २१ डिसेंबर २०१२ अखेरपर्यंत २१ लाख शहरातील पथदिव्याची थकबाकी असल्याने ४ जानेवारी पासून पथदिव्याचे वीज कनेक्शन तोडले आहे. त्यामुळे तब्बल दहा दिवसानंतर नगरपालिकेने २१ लाख रुपयापैकी ५ लाख रुपये १४ जानेवारी रोजी महावितरण कंपनीस थकबाकी पोटी भरले. त्यानंतर वीज वितरण कंपनीने अर्धवट बाजार लाईनचे पथदिवे चालू केले. पूर्ण थकबाकी वसूल करण्यासाठी पुन्हा वीजवितरण कंपनीने चालू करण्यात आलेले बाजार लाईनचे पथदिव्याची वीज तोडली. त्यामुळे शहरातील पथदिवे पूर्णपणे बंद असल्याने शहरावर अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. त्यातच भरीस भर म्हणून की काय पाणीपुरवठ्याच्या जॅकवेल, फिल्टरसहीत शहरातील काही विंधन विहीरी असे मिळून १८ वीज कनेक्शनचे वीज पुरवठा थकबाकी असल्याने शुक्रवार रोजीपासून खंडीत केल्यामुळे शहरवासीय पाण्यासाठी दाहीदिशा भटकत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. नगरपालिकेकडे पाणीपुरवठा विभागाची १४ लाख ३३ हजार चालू बिलाची एकूण थकबाकी असून त्यापैकी १४ पाणीपुरवठ्याच्या कनेक्शनचे मिळून ९ लाख ५६ हजार रूपये नगरपालिकेने भरल्याचे सांगून वीज वितरण कंपनीचे शाखा अभियंता सचिन चव्हाण यांनी पुढे सांगितले की, ४ लाख ७७ हजार वीजवितरण कंपनीची येणे थकबाकी असल्याने दि. ८ रोजीपासून बोरी धरणावरील जॅकवेल, वसंतरनगर, रहीमनगर, हुतात्मा निलय्या स्वामी उद्यान येथील वीज कनेक्शन तोडले आहे. वीजवितरणची थकबाकी नगरपालिकेने भरावी, याकरीता वारंवार नोटीस दिली आहे. मात्र नगरपालिकेने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आम्हाला वीज तोडण्याशिवाय पर्याय नाही, असे सांगून सदरील थकबाकी पूर्ण भरल्याशिवाय खंडीत केलेला वीजपुरवठा चालू करणार नसल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.
याप्रकरणी नगराध्यक्ष शब्बीरअली सावकार यांच्याशी संपर्क साधले असता, पथदिव्याची काही प्रमाणात थकबाकी भरली आहे. मात्र नगरपालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याने वेळेवर वीज बील भरले नसल्याची कबुली देऊन तातडीने पाणीपुरवठा सुरु करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.