उस्मानाबाद -: कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण, स्त्रीभृण हत्या, अनैतीक व्यवसाय व मानवी व्यापार प्रतिबंध, हुंडा प्रतिबंध, देवदासी प्रथा नाहीशी करणे, बालविवाह प्रतिबंध आदि सामाजिक उपक्रमाचे देखावे गणोशोत्सवात सादर केलेल्या सार्वजनिक गणेश मंडळास पारितोषिक देवून गौरवण्यात येणार आहे. इच्छुक गणेशमंडळाच्या अध्यक्षांनी आपले प्रस्ताव दि. १० फेब्रुवारी पर्यंत सादर करावेत,असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यु.पी. बिराजदार यांनी केले आहे.
       जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती या गणेश मंडळाची निवड करणार आहे. इच्छुक गणेश मंडळाच्या अध्यक्षांनी आपले अर्ज योग्य त्या कागदपत्रासह विहीत नमुन्यात जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, कक्ष क्र. १५ तळमजला, उस्मानाबाद येथे सादर करावेत.
 
Top